Shreeganesh Sabhagruha

AC Banquet Hall

श्रीगणेश सभागृह हे १९९४ मध्ये गोखले बंधू यांनी पुणे येथे स्थापन केले आणि त्याच बरोबर एक भव्य हॉल मंगल कार्यासाठी नावारूपाला आला. काही वर्षातच हॉलची लोकप्रियता वाढली ती त्याच्या वेगळ्या वैशिष्ठ्यांमुळे. येथे तुम्हाला १८००० स्क्वे.फू.मध्ये दोन भव्य हॉल, त्याच्या दोन्ही बाजूला दोन मोठी लॉन्स, वधू व वर यांच्यासाठी प्र त्येकी २ प्रशस्थ खोल्या, सेफ्टी लॉकर्स त्याला जोडूनच टॉयलेट बाथरूमची सोय आणि हे सर्व तळमजल्यावर उ पलब्ध होते, म्हणजेच तुमच्या आनंदमयी समारंभाचे ‘वन रूफ सोलूशन’. सभागृहाच्या याच वैशिष्ठ्यांमुळे आता ते पुण्यातील एक नामांकित मंगल कार्यालय म्हणून ओळखले जाते. सर्व प्रकारच्या समारंभांसाठी योग्य असा हॉल व येथील स्वस्त दर तुम्हाला तुमच्या आनंदाच्या क्षणी सुखावून जातात.
श्रीगणेश सभागृह हे कर्वेरोडवर शहराच्या मध्यभागी असून येण्याजाण्याच्या सुलभ सोयीमुळे इतरांपेक्षा वेगळे ठरते, आणि त्यामुळेच शहराच्या व शहराबाहेरच्या भागातून येणे सहज शक्य होते. कार्यालयाच्या आवारातच पार्किंगची उत्तम सोय उपलब्ध असून, तुमच्या गरजा एकाच ठिकाणी पूर्ण होतात.

आमच्या सभागृहात डेकोरेशन, केटरींग, पार्किंग, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी या सर्व सुविधा अचूकतेने पुरविल्या जातात. सभागृहातील चांगल्या व्यवस्थापकांमुळे तुमच्या गरजा व शंकांचे निरसन होते. येथील परिपूर्ण व्यवस्थेमुळे तुम्हाला तुमचा मंगल सोहळा आनंदाने अनुभवयास मिळतो.

©Copyright-2023 Shreeganesh Sabhagruha | Designed & Developed By Akhand Solutions